मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) मंत्रालयात पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या (Dhangar Community) उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून योजनांचे सनियंत्रण करण्यासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील निर्यातीला वेग देण्यात येणार असून यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून यासाठी ४२५० कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal : आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव; भुजबळांचा गंभीर आरोप
तसेच मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता देण्यात आली असून यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार आहे. तर २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार आहे. तर अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत. याशिवाय गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरण्यात येणार आहेत.
तर मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार असून राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असून याचा संत्रा उत्पादकाना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्यात येणार असून बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पेटणार; उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस
त्याबरोबरच महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापन करण्यात येणार असून रेतन केंद्रे रोगमुक्त करण्यात येणार आहे. तसेच नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारकडून (State Government) पाऊले उचलण्यात येणार असून एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ करण्यात येणार आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट