Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याCabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा...

Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार

मुंबई | Mumbai

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशातच १० दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

- Advertisement -

यावेळी अजित पवारांनी स्वतः उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, अद्याप कोणत्याही नवीन मंत्र्याला खाते देण्यात आलेले नसल्याने खातेवाटपाचा (Account Allocation) तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यातच आता खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

भिमाशंकरला जाणाऱ्या बसचा अपघात ; प्रवाशांसह बस ओढ्यात कोसळली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा तिसऱ्या टप्प्यातील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) पावसाळी अधिवेशनाआधी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र,आता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली असून राज्य सरकारचा तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे मंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न बघणाऱ्या आमदारांना (MLA) आता काही काळ थांबावे लागणार आहे. तर राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांचे रखडलेले खातेवाटप पावसाळी अधिवेशनाआधी (Monsoon Session) मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“संजय राऊतांचा एका अर्थाने बळी गेला…;” नीलम गोऱ्हेंचे विधान चर्चेत

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी (१२ जुलै) रोजी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या चर्चेनंतर अर्थ आणि सहकार खात राष्ट्रवादीकडे येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या