Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याएसटीसाठी दिले ५०० कोटी, कर्मचाऱ्यांचे वेतन मिळणार

एसटीसाठी दिले ५०० कोटी, कर्मचाऱ्यांचे वेतन मिळणार

मुंबई / प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या (st)कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांनी दिल्यानंतर गुरुवारी हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला. त्यामुळे वेळेवर वेतन (salary)न मिळाल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांना (worker)दिलासा मिळणार आहे.

करोनामुळे लागलेले निर्बंध, रोडावलेली प्रवासी संख्या, इंधनाची दरवाढ आदी कारणांमुळे एसटी महामंडळ आर्थिक गाळात आहे. एसटी महामंडळ तोट्यात गेल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ६०० कोटी रुपयांची मदत मागितली होती. त्यावर अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत असे निर्देश पवार यांनी दिले होते. निधी मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या