तसेच लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई-भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. तर वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. तर संजय गांधी निराधार योजनेची १००० वरुन १५०० रुपये पेन्शन करण्यात येणार आहे. यासोबतच ३४ हजार घरकुल दिव्यांगासाठी बांधली जाणार असून दिल्ली, बेळगाव येथे मराठी भाषा भवन बांधले जाणार आहे. तसेच
काश्मीर, अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून माहूरगड, एकविरा देवी विशेष विकास प्राधिकरणाची स्थापना
करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ५० पर्यटन स्थळांची निवड केली जाणार असून ३२ गडकिल्ल्यांचे नुतनीकरण केले जाणार आहे. तर छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून असंघटित कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविण्यात येणार असून ३७ हजार अंगणवाड्यांना सौर उर्जा दिली जाणार आहे. तर ४४ लाख नुकसान झालेल्या शेतकरी यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच १ लाख महिलांना रोजगार दिला जाणार असून महिलांसाठी पाच हजार पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविकांची १४ लाख पदे भरण्यात आली असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
तसेच महामार्गाच्या बाजूला २५ हजार बांबूंच्या झाडांची लागवड करण्यात येणार असून सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासोबतच अंगणवाड्यांना सौर उर्जा पुरविण्यात येणार असून सध्या ७८ हजार ७५५ सौरपंप कार्यरत आहेत. याशिवाय मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषीपंप योजना सुरु करण्यात येणार आहे. तर निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क उभे केले जाणार असून
कोल्हापूर-सांगलीचा पूर टाळण्यासाठी ३ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील दुष्काळासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पावर पुढे म्हणाले की, संभाजीनगर विमानतळासाठी ५०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तर वन विभागाला २ हजार ७०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्जा विभागासाठी १ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून वीज दर सवलतीत १ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय ३०० युनिट्सपर्यंतची वीज देखील मोफत मिळणार असून राज्य सरकारचे ७ हजार मेगावॅट विजनिर्मितीचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तर सामान्य प्रशासन विभागाला १ हजार कोटी आणि पशुसंवर्धन विभागाला ५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच १ ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल सुरु आहे. तर वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत केला जाणार आहे. तर सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार आहे. रेडीओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु होणार असून मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच अर्थसंकल्पात फलटण ते पंढरपूर महामार्गाला मान्यता देण्यात आली असून जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी ५० टक्के रक्कम सरकार देणार आहे. ही चौथी मार्गिका असणार आहे. तर रत्नागिरी भागवत बंदरसाठी ३०० कोटी रुपये देण्यात येणार असून मिरकरवाडा बंदर नव्याने कऱण्यात येतं आहे. संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येत असून अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे.
याशिवाय राज्यात १८ वस्त्रोद्योग उभारले जाणार असून नियोजित रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचा प्रस्ताव आहे. तसेच १९ हजार ९०० कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. तर नगर विकास विभागासाठी ९ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. वरळी- नरिमन पॉईंट कोस्टल रोड अंतिम टप्प्यात असून राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात आले आहेतयावेळी अजित पावर म्हणाले की, ग्रामीण भागात १ कोटी ४८ लाख नळ जोडण्यात येणार आहेत. तर १ लाख रोजगार आणि २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल. नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार असून लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार आहे. मूर्तीजापूर-यवतमाळसाठी ५० टक्के निधी देण्यात येणार आहे. तसेच नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे भूसंपादन प्रक्रिया सुरु असून ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्यात येणार आहे. ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्याला ८ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलं. कालपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत एकूण ८,६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यानंतर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत आहेत.