Thursday, November 12, 2026
Homeमहाराष्ट्रजलजीवन मिशनला ३ हजार कोटींची सुधारित मान्यता; पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा...

जलजीवन मिशनला ३ हजार कोटींची सुधारित मान्यता; पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा निर्णय

मुंबई | Mumbai

चुकलेले नियोजन, सर्वेक्षणातील त्रुटी, अंमलबजावणीतील विलंब आणि योजनेतील बदलामुळे जलजीवन मिशन योजनेचा खर्च दुप्पट वाढला असताना राज्य सरकारवर आता तांत्रिक बदलामुळे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, परभणीतील योजनांना तब्बल ३ हजार ७३ कोटी रुपयांची सुधारित मान्यता देण्याची नामुष्की ओढवली आहे.

- Advertisement -

जलजीवन योजनेतील डिझाईन चुकीची केल्यामुळे खर्च वाढल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. नेमकी हीच कारणे या तेरा प्रस्तावांना सुधारित प्रशासकीय मान्यता देताना नमूद केली आहेत. तांत्रिक बदल आणि वस्तू व सेवा कराच्या दरात (जीएसटी) वाढ झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या तेरा प्रस्तावांना एका टप्प्यात मान्यता दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील मौजे बाजार सांगवीमधील जलवीजन मिशन कार्यक्रमातील नळपाणी योजनेच्या ४६ कोटी ६ लाख रुपयांच्या मूळ खर्चाला सुरवातीला मान्यता देण्यात आली होती. पण तांत्रिक बदलामुळे या योजनेचा खर्च १२५ कोटी ७५ लाख रुपयांवर गेला आहे तर खुलताबादमधील मौजे झरीमधील जलजीवन योजनेचा मूळ खर्च ८६ लाख ९४ लाख रुपयांचा होता. पण तांत्रिक बदल आणि जीएसटी करातील वाढीमुळे हा खर्च १८४ कोटी ७ लाख रुपयांवर गेला आहे. बोखडमध्ये ३२ कोटी ८५ लाख रुपयांच्या मूळ प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. पण आता सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर या प्रकल्पाचा खर्च १३२ कोटी ४६ लाख रुपयांवर गेला आहे.

जलजीवन मिशनचा खर्च दुप्पट होऊनही काम अपूर्ण असल्याचा गंभीर ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. राज्यात सुरु केलेल्या सुमारे ५१ हजार ५६० पाणी पुरवठा योजनांपैकी केवळ १२ हजार ७०३(२४.६४ टक्के) योजना पूर्ण झाल्या. तर ३८ हजार ८५७ योजना(७५.३ टक्के) प्रलंबित असल्याकडे
कॅगने लक्ष वेधले आहे. या योजनेसाठी केंद्राकडून ५९ कोटी ७४० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. पण उपयोगिता प्रमाणपत्र उशीरा दिल्याने केवळ २७ हजार ६५७ कोटी रुपये (४६.३ टक्के निधी) मिळाल्याच्या त्रुटीवर कॅगने बोट ठेवले आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...