Wednesday, November 20, 2024
Homeनाशिकनाशिकचा हर्षवर्धन आणि शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरीची फायनल

नाशिकचा हर्षवर्धन आणि शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरीची फायनल

पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि.०७) हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमधून गत विजेता बाला रफिक आणि उपविजेता अभिजित कटके दोघेही बाहेर पडल्याने हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होता. त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम सामन्यातून नाव महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला लाभणार आहे.

महाराष्ट्रातील पैलवानांसाठी प्रतिष्ठेची असणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती 2019-20’ स्पर्धेचा आज सन्तिम सामना पुणे येथे सायंकाळी होत आहे. या सामन्यासाठी एकाच तालमीत घडलेले हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे यंदा चांदीची गदा कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

दरम्यान काल झालेल्या सामन्यात माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेने गतविजेता बाला रफिक शेखला चितपट केले तर दुसऱ्या उपांत्य अटीतटीच्या लढतीत पैलवान शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगताप वरती विजय मिळवला. तर मॅट मध्ये चौथ्या फेरीत अभिजित काटकेने लातूरच्या सागर बिराजदार वरती विजय मिळवला.

तर हर्षवर्धन सदगीर याने मुंबई उपनगरच्या सचिन येलभर वरती विजय संपादित केला. त्यानंतर गादी विभागात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने गतसालाचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटकेवर ५ विरुद्ध २ अशा गुण फरकाने पराजित करत धक्कादायक निकालाची नोंद करत ‘महाराष्ट्र केसरी’ साठी अंतिम फेरीत धडक मारली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या