Friday, April 25, 2025
Homeनगरकुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा - मंत्री मोहोळ

कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा – मंत्री मोहोळ

महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा उत्साहात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे. त्यामुळे येथील मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे ही आनंदाची बाब आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळेस कुस्तीला सोन्याचे दिवस होते. मात्र, आता हे वलय कमी होत आहे. त्यामुळे कुस्तीला गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

- Advertisement -

मंत्री मोहोळ यांच्याहस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी वाडियापार्क येथे येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामदास तडस, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुण जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव दगडे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके आदी उपस्थित होते.

मंत्री मोहोळ म्हणाले, कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्थापन होऊन गेल्या 67 वर्षांपासून प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून देशात नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण करायचे आहेत. यासाठी ही स्पर्धा चांगली होणे आवश्यक आहे. कुस्तीगिरांचे मनोधैर्य वाढवणारी स्पर्धा आहे. नगरची स्पर्धा कुस्तीची लोकप्रियता वाढवेल असेच यशस्वी नियोजन आ. जगताप करतील. यासाठीच नगरला यजमानपद दिले आहे. कुस्तीगिरांना हक्काचे व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांची प्रतिष्ठाही संघटना वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून कुस्तीगीरांना थेट शासकीय सेवेत घेऊन त्यांची प्रतिष्ठा वाढवली आहे.

त्यामुळे या क्षेत्राला नवी संजीवनी मिळाली आहे. अहिल्यानगरची ही स्पर्धा सुंदर, लेखणी व नियोजनबध्द होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात स्पर्धेचे संयोजक आ. जगताप म्हणाले, राज्यातील सर्वात मोठ्या कुस्तीचा थरार नगरमध्ये रंगणार आहे याचा आनंद होत आहे. नगरच्या लाल मातीने अनेक मल्ल दिले आहे. या लाल मातीच्या पूजनाला केंद्रीय मंत्री येणे हे अभिमानास्पद आहे. ही स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देणारी व प्रेरणादायी स्पर्धा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरजवळ विमानतळ व्हावे – आ. जगताप
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ऐतिहासिक अहिल्यानगर शहराजवळ विमानतळ व्हावे, अशी मागणी केली. नगर शहर हे ऐतिहासिक ठिकाण असून याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. हे शहर महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असून ते विदर्भ, मराठवाडा, खान्देशला जोडणारे आहे. शिर्डी, शिंगणापूरला येणारे भाविक नगर शहरातून जातात. शहराच्या अवतीभवती लष्कराचे तळ असून भविष्यात याठिकाणी विमानतळ झाल्यास त्याचा शहराला फायदा होणार आहे. शहराच्या लगत मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी उपलब्ध असून शहराची वाटचाल ही मेट्रोसिटीच्या दिशेने सुरू आहे. नगरपासून काही अंतरावर हिवरेबाजार आणि राळेगणसिध्दी ही आदर्श गावे आहेत. तसेच शहराच्या अवघ्या पाच किलो मीटरवर अवतार मेहरबाबा यांची समाधी असून याठिकाणी देश, विदेशातून भाविक येतात. यामुळे नगरला विमानतळाची गरज असल्याची मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...