Thursday, March 13, 2025
Homeनगरमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण; उद्या होणार दिमाखदार उद्घाटन

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण; उद्या होणार दिमाखदार उद्घाटन

माती व गादी वरील कुस्त्यांचा रंगणार थरार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे (Maharashtra Kesari Wrestling Tournament) यजमानपद अहिल्यानगरला मिळाले असून उद्या दि.29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत माती व गादी या दोन्ही प्रकारांमध्ये कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर (Wadiapark Ground) उभारण्यात आलेल्या स्व. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत भव्य स्टेज, रेसलिंग प्लॅटफॉर्म, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. कुस्त्यांसाठी गादीचे 2 व मातीचे 2 असे चार आकडे तयार करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील 41 जिल्ह्यांमधून सुमारे 860 मल्लांचे शहरात आजपासूनच होण्यास सुरवात होणार आहे. तब्बल पाच दिवस चालणार्‍या या स्पर्धेसाठी 125 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंचाची नेमणूक करण्यात आली आहे. मैदानात भोवती सुमारे 25 हजार कुस्ती शौकिनांसाठी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली असून तिची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा.डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी गेल्या पंधरा-वीस दिवसापासून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळपासून राज्यातून आलेल्या मल्लाचे गटाप्रमाणे वजन घेण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातून येणार्‍या सुमारे सर्व मल्लांची राहण्याची व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी वाडियापार्क (Wadiapark Ground) येथे तळ ठोकून असून सर्व व्यवस्था व तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती कुस्तीगीर संघाचे कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक शिर्के व अर्जुन शेळके यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांसाठी दोन मातीचे व दोन गादीचे असे चार आकडे तयार करण्यात आले असून एकाच वेळेस चारीही आखड्यांवर कुस्त्या रंगणार आहेत. दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 व दुपारी 4 ते 9 पर्यंत कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. कुस्त्यांचा हा थरार पाहण्यासाठी शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यालयीन सचिव निलेश मदने यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी लाल मातीचे दोन्ही आखाडे तयार झाले असून या आखाड्यांमध्ये कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकार्‍यांनी हळद, गेरू व तेल मिसळले आहे.

मानाच्या चांदीच्या गदेचे आज सायंकाळपर्यंत शहरात आगमन 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप हे स्वतः नगरमध्ये आणणार आहेत. आ.संग्राम जगताप हे आज केंद्रीय राज्य मंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची पुण्यात भेट घेणार असून यांच्या कडून चांदीची गदा (Silver Mace) स्वीकारणार आहेत. आज सायंकाळपर्यंत या मानाच्या चांदीच्या गदेचे शहरात आगमन होईल.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...