Saturday, October 3, 2026
Homeराजकीयविधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?

मुंबई । Mumbai

आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला जागावाटपाचा तिढा अखेर वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर सुटला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘पुणे शिक्षक मतदारसंघा’वरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, अंतिम वाटाघाटींनंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्याच (BJP) वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

महायुतीचा जागावाटपाचा ‘हा’ आहे फॉर्म्युला:

  • पुणे शिक्षक मतदारसंघ: भारतीय जनता पक्ष (BJP)
  • पुणे पदवीधर मतदारसंघ: भारतीय जनता पक्ष (BJP)
  • नागपूर पदवीधर मतदारसंघ: भारतीय जनता पक्ष (BJP)
  • अमरावती मतदारसंघ: शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
  • छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा पदरात पडताच भाजपच्या गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन तिन्ही मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची यादी सोपवली आहे. भाजपने प्रत्येक जागेसाठी ५-५ पर्यायी उमेदवारांची चाचपणी केली असून, एकूण १५ नावांचे पॅनेल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आले आहे. पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला गेल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मंगेश चिवटे यांना ऐनवेळी मोठा धक्का बसला आहे. चिवटे गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करत होते आणि गाठीभेटीही घेत होते. मात्र, ही जागा भाजपला गेल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही स्थानिक इच्छुकांमध्ये यामुळे नाराजी पाहायला मिळत असली, तरी महायुतीचा धर्म पाळत वरिष्ठ नेत्यांकडून सर्वांची समजूत काढली जाईल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ​हाय-सिक्युरिटीत रंगला कैद्यांचा कॅरम! नाशिकराेड कारागृहातील व्हिडीओ व्हायरल;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अत्यंत संवेदनशील आणि हायप्रोफाइल कैद्यांचा भरणा असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या (Nashik Road Central Jail) सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह...