मुंबई –
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 सप्टेंबरला
- Advertisement -
त्यांनी स्वतः ट्विट करुन त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट्स घालून रुग्णालयांची पाहणी केली होती तरीही त्यांना करोना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.