Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVishakha Subhedar : हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला; सरकारकडे रडत...

Vishakha Subhedar : हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला; सरकारकडे रडत रडत मागितली मदत

मुंबई |Mumbai

- Advertisement -

इराण विरुद्ध इस्राईल-युसएमध्ये (America Israel and Iran War) सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सगळेच चिंतेत आहेत. मध्य पूर्वेतील हा तणाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला चोख प्रत्युत्तर देताना कुवेत, दुबईसह अनेक देशांवर हल्ले केले आहेत. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहेत. याचा फटका मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला बसला आहे.

विशाखा सुभेदारचा (Vishakha Subhedar) मुलगा अभिनय सुभेदार काही दिवसांपूर्वी लंडनला निघाला होता. त्याठिकाणचे शिक्षण पूर्ण करुन तो भारतात आला होता. तसेच पुन्हा लंडनला जाणार होता. त्याला विमानतळावर सोडण्यासाठी विशाखा सुभेदार आपल्या संपूर्ण कुटुंबासह विमानतळावर गेल्या होत्या. मात्र, मुलगा अभिनयचे विमान लंडनला न जाता कुवेतमध्येच उतरलं आणि तो तिथेच अडकला. याबाबतची माहिती विशाखा यांनी एका व्हिडीओद्वारे दिली असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मुलाला परत आणण्यासाठी मदत मागितली आहे.

सुभेदार यांनी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणत आहेत की, “नमस्कार! मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे…माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र कुवेतमध्ये lay over असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. गेले चार दिवस एअर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहित आहे विमानं रद्द करण्यात आली आहे.

माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. तो स्वत: तिथे अनुभवतोय. तिथे हल्ले होत आहेत. एअरलाईनने आत्ता त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. इंडियन अँबेसीने व्यवस्था केली आहे. पण आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्येही भारतीये अडकलेत त्यांना परत आणावं. ही माझी कळकळीची विनंती आहे. अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची मायदेशी वाट बघत आहे. लवकरात लवकर त्यांना परत आणा, त्यांची काळजी घ्या एवढीच विनंती आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...