मुंबई | Mumbai
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकुम येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुन वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी याप्रकरणात चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, “हगवणे कुटुंबातील (Hagawane Family) या सगळ्यांना ताकद का मिळाली? तर यांच्यामागे जालिंदर सुपेकर हे नाव होतं, त्यांच्यामुळे ताकद मिळाली. आता सुद्धा ते सहा ते सात दिवस फरार होते. ते कोणाच्या मदतीने फरार झाले? पहिल्या दिवसापासून मला हेच कळलं की वैष्णवीचे वडील (Father) सुद्धा सांगत आहेत की ही आत्महत्या (Suicide) नाही तिचा घात झाला आहे. तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्ट आलेले आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे दमानिया म्हणाल्या की,”वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Death Case) आरोपी निलेश चव्हाणला (Nilesh Chavan) बंदुकीचे लायसन्स हे सुपेकर यांच्यामुळेच मिळाले. त्याला ग्रामीण पातळीवर परवानगी नाकारण्यात आली होती, पण ती सुपकेर यांनी मिळवून दिली, हगवणे यांची सून मयुरीच्या आईने देखील जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात महिला आयोगामध्ये पत्र दिले होते. जालिंदर सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे होती, म्हणूनच त्यांनी हे सर्व केले. त्यामुळे सुपेकरांवर तातडीने कारवाई व्हायला हवी”, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तसेच “जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात (Jail) जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. ५०० कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणातील चौकशीतून आपले नाव वगळावं आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नाव टाकावे यासाठी सुपेकर यांनी दबाव टाकल्याचा”, आरोपही अंजली दमानिया यांनी केला. तर वाल्मिक कराडला (Walmik Karad) जे समर्थन मिळालं ते सुद्धा सुपेकर यांच्यामुळेच मिळाले, असेही त्यांनी म्हटले.
ऑडिओ क्लिप
यावेळी पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. ही ऑडिओ क्लिप अद्याप व्हेरिफाय नाही. पण, ती व्हेरिफाय करण्याचे पोलिसांच्या हातामध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप (Audio Clip) मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे, असे त्यांनी म्हटले.