Thursday, July 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : साकीनाका दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे -...

Maharashtra News : साकीनाका दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे – विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या दुर्घटनेचे पडसाद गुरुवारी विधानसभेत (Vidhansabha) उमटले. या दुर्घटनेत उघड्या गटारात पडून ६० वर्षीय अस्लम इसाक शेख या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला. झालेली घटना अत्यंत गंभीर असून काही वर्षांपूर्वी मुंबईतील प्रख्यात डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा गटारात पडून दुर्देवी मृत्यू झाला होता. अशा घटनांमध्ये केवळ निलंबन करून चालणार नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल झाला पाहिजे, असे स्पष्ट मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यावेळी व्यक्त केले

- Advertisement -

भाजपचे अमित साटम यांनी आज साकीनाका (Sakinaka) येथे घडलेल्या दुर्घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. साकीनाका, खैरानी रोड येथे महापालिकेच्या गटाराचे झाकण उघडे होते. काम सुरू असताना या उघड्या गटारात पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात एफआयआर नोंदवला पाहिजे. याशिवाय महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे.

दरम्यान, या दुर्घटनेची केवळ चौकशी नाही तर कारवाई (Action) झालेली दिसली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. अत्यंत गंभीर असा विषय सभागृहासमोर आला आहे. मुंबईत पाणी तुंबते. अनेक ठिकाणी कामे सुरु असतात. गटारे उघडी असतात. खड्डे खणलेले असतात, असे सांगत त्यांनी साकीनाका प्रकरणी निवेदन करण्याचे निर्देश सरकारला दिले.

ताज्या बातम्या

Women Farmer Bill : शेतकरी महिला विधेयक विधानसभेत मंजूर, परराज्यातील शेत...

0
मुंबई । प्रतिनिधी शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात...