Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसोशल मीडियावर 'ChatGPT 80s Photo Trend' चा धुमाकूळ; AI ने बनवा तुमचा...

सोशल मीडियावर ‘ChatGPT 80s Photo Trend’ चा धुमाकूळ; AI ने बनवा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक

५ मिनिटांत असा मिळवा विंटेज लूक, वापरा 'हे' सोपे प्रॉम्प्ट्स

मुंबई | Mumbai

सध्या सोशल मिडियावर (Social Media) ८० च्या दशकातील ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून (Narendra Modi) ते विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह (Rahul Gandhi) विविध पक्षातील राजकीय नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते नाना पटोले, विश्वजित कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनोद तावडे यांच्यासह आदी नेत्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

तसेच सोशल मीडियावर सक्रीय असलेले लोक देखील आजचे साधे फोटो थेट १९८०च्या दशकातील विंटेज फोटोमध्ये बदलून ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. “आजचा माझा फोटो जर १९८० च्या दशकात काढला असता तर मी कसा दिसलो \ दिसले असतो? या कल्पनेवर आधारित हा ट्रेंड सध्या तुफान व्हायरल होत आहे. ८० च्या दशकातील बॉलिवूड स्टुडिओ पोर्ट्रेट, जुना फॅमिली अल्बम, डिस्कॉ लूक आणि दूरदर्शन काळातील लूक अशा विविध शैलींमध्ये स्वतःचे फोटो री-क्रिएट करत आहेत.

केवळ फिल्टर नाही, तर एआयचा (AI) जादूई बदल

या ट्रेंडचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा फोटोवर केवळ सामान्य फिल्टर लावण्यापुरता मर्यादित नाही.ChatGPT चे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) फोटोतील व्यक्तीचा चेहरा ओळखून ८० च्या दशकातील फॅशननुसार कपडे, हेअरस्टाइल, दागिने, पार्श्वभूमी (Background) आणि प्रकाशयोजना बदलून हुबेहूब रेट्रो लूक तयार करते. यामुळे फोटोला ॲनालॉग फिल्म ग्रेन (Analogue film grain), सॉफ्ट फोकस आणि विंटेज रंगांचा अनोखा स्पर्श मिळतो.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर ‘Add Yours’ ची धूम

हा ट्रेंड केवळ इन्स्टाग्राम फीडपुरता मर्यादित नसून स्टोरीजवरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. युजर्स ‘Add Yours’ स्टिकरचा वापर करून आपल्या मित्रांना आणि फॉलोअर्सना या युनिक ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

फोटो पोस्ट करण्यापूर्वी ही काळजी घ्या

एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले हे फोटो केवळ एका कल्पनेवर आधारित असतात. काही वेळा एआय फोटोतील चेहरा, हाताची बोटे, दागिने किंवा पार्श्वभूमीत काही चुका करू शकते. त्यामुळे असा कोणताही एआय फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तो व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे.

ChatGPT मध्ये असा तयार करा तुमचा ’80s Retro Look’

१. फोटो निवडा : चेहरा स्पष्ट आणि चांगला प्रकाश असलेला फोटो निवडा.
२. ChatGPT मध्ये अपलोड करा : ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन तुमचा फोटो अपलोड करा.
३. प्रॉम्प्ट (Prompt) टाइप करा : फोटोसोबत खालीलपैकी एका शैलीचा प्रॉम्प्ट वापरून एआयला कमांड द्या.

कोणत्या लुकसाठी कुठला प्रॉम्प्ट द्यावा?

८०s बॉलिवूड लूक (80s Bollywood Look)

Transform this photo into an authentic 1980s Bollywood studio portrait. Keep my face recognisable and add period-appropriate Indian clothing, hairstyle, jewellery, warm studio lighting and subtle film grain.

फॅमिली अल्बम लूक (Old Family Album Look)

Recreate this photo as an Indian family album photograph from the mid-1980s, with period-appropriate clothing, hairstyles, background, analogue film grain and slightly faded colours.

८०s डिस्कॉ लूक (80s Disco Look)

Reimagine this photo as an authentic 1980s disco photograph with retro clothing, colourful lights, vintage hairstyle, soft focus and analogue film texture.

दूरदर्शन काळ (Doordarshan-Era Look)

Recreate this photo in the visual style of an Indian television portrait from the 1980s, with period clothing, a simple studio background, warm lighting and analogue film grain.

ताज्या बातम्या