Friday, October 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : ठाकरे सेनेच्या 'रामरक्षा आंदोलना'वर CM फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले,...

Devendra Fadnavis : ठाकरे सेनेच्या ‘रामरक्षा आंदोलना’वर CM फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले, “शेवटी उद्धवजींना राम…”

मुंबई | Mumbai

अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) दानपेटीत झालेली कथित चोरी आणि निधीच्या अपहाराचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) मुंबईतील दादर (Dadar) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आदी नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांनी त्यांना ठाकरे गटाच्या ‘रामरक्षा आंदोलना’बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. ते म्हणाले की, “शेवटी उद्धवजींना राम आठवले आहेत. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजेत. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली.” अशी टीका फडणवीसांनी केली.

‘अब हिंदू माफ नही करेगा’; दादरमध्ये जोरदार तयारी

ठाकरे गटाचे (Thackeray Group) हे आंदोलन आज (दि. ५ जुलै) रोजी दादर (पश्चिम) येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरासमोर होणार आहे. या आंदोलनासाठी ‘अब हिंदू माफ नही करेगा’ असा आक्रमक नारा देण्यात आला आहे. मुंबईतील दादर प्लाझा, कबुतरखाना आणि कलानगर या मुख्य परिसरांमध्ये या आंदोलनाचे मोठे बॅनर्स लावण्यात आले असून शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

या आंदोलनाची घोषणा करताना ‘मातोश्री’ येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की,’हिंदू मार नहीं खाएगा, असे एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. आज मी तसेच म्हणतोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत, हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राम मंदिर दानपेटीतील या चोरीविरोधात आमची शिवसेना आंदोलन करत आहे. जाब विचारण्यासाठी आम्ही दादर कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरात एकत्र येऊन रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण करणार आहोत” असे त्यांनी सांगितले होते.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...