मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांवरील (Santosh Deshmukh) अत्याचाराचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवरतीय वाल्मिक कराड यांचा आरोपी म्हणून समावेश झाल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अशातच आता मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी काल ३ मार्चला रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवल्याचे बोलले जात आहे. आज राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावर औपचारिक निर्णय घेतील अशी माहिती आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती.
या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार काल रात्रीच धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिला की नाही? हे आज दिवसभरात स्पष्ट होईल.