Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; सर्व मंत्री...

Devendra Fadnavis : PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; सर्व मंत्री आणि अधिकार्‍यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसेच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ला (SPG) आदेश दिले आहेत.त्यांनी आपल्या ताफ्यात ५० टक्के कपात केली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेत सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

तसेच मंजूर झालेले दौरेही रद्द करण्यात यावे असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी (CM) दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यातील कोणत्या मंत्र्यांच्या (Ministers) ताफ्यात किती वाहने आहेत? याचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहने असतील ती कमी केली जाणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग ही मोहीम हाती घेणार आहे. तर अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रीकल वाहन (Electric Vehicle) खरेदी करायला सुरुवात केली आहे.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केला लंडन-पॅरिस दौरा रद्द

राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. मात्र, देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून, आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू...