Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : नदीजोड प्रकल्पांतून महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी CM फडणवीसांचा...

Devendra Fadnavis : नदीजोड प्रकल्पांतून महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी CM फडणवीसांचा निर्धार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या मागच्या आणि सध्याच्या पिढीने भीषण दुष्काळ अनुभवला आहे, मात्र येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांत नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी आणून राज्य कायमचे दुष्काळमुक्त करू, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर त्यांनी राज्याला संबोधित केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विकासदर, शेतकरी कल्याण, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला.

- Advertisement -

महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ अन् ‘स्टार्टअप कॅपिटल’

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची (Maharashtra) भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की,महाराष्ट्र हे सध्या देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून सर्वाधिक परकीय गुंतवणूक (FDI) आणि एकूण गुंतवणूक राज्यातच येत आहे. यामुळे तरुण पिढीसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांवर चालून राज्य प्रगतीकडे वाटचाल करत आहे.महिलांना औपचारिकरीत्या ‘शेतकऱ्याचा दर्जा’ देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के; प्रत्येक जिल्हा बनणार ‘ग्रोथ इंजिन’

राज्याच्या आर्थिक स्थिरतेवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राने ८.८ टक्के असा उच्च आर्थिक विकासदर (GDP Growth Rate) साध्य केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा विकासाचे केंद्र (Growth Engine) बनवण्याचे लक्ष्य असून १३ जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले आहे.गडचिरोली, पालघर आणि नंदुरबार यांसारख्या दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत विकासाची फळे पोहोचवली जात आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफी आणि सौर ऊर्जेचा ध्यास

फडणवीस पुढे म्हणाले की, आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. याद्वारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत आहोत.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे जे स्वप्न बघितले होते ते सफल होत असून, जवळपास ७६ टक्के शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आहोत. त्यामुळे आता पुढच्या वर्षभरामध्ये १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसाची वीज देण्याचा संकल्प पूर्ण करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : संदीप फाउंडेशनच्या ओक्रा कॅन्टीनमध्ये अस्वच्छतेचा कळस; अन्नपदार्थांत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विद्यार्थ्यांच्या (Student) आरोग्याशी संबंधित तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संदीप फाउंडेशन (Sandip Foundations) येथील ओक्रा कॅन्टीनविरुद्ध कठोर...