Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis On Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांना जरांगेंनी आईवरुन शिवी दिल्याचा आरोप;...

Devendra Fadnavis On Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांना जरांगेंनी आईवरुन शिवी दिल्याचा आरोप; CM फडणवीस पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, “जो आपल्याला शिवरायांचा…”

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ते उद्या अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे (Mumbai) रवाना होणार आहेत. त्यातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही. महिलेच्याबाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही”, असे त्यांनी म्हटले. तर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेतो”, असे सांगितले.

YouTube video player

दुसरीकडे जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री असताना त्यांना आरक्षणाचं काम करू दिले नाही,असे म्हटले होते. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत. एकनाथ शिंदे यांनीही असं काही झालं नसल्याचं सांगितलं आहे. कोणीही काडी टाकण्याचा आणि बांबू टाकण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेंसोबत माझे चांगले संबंध आहेत,” असा खुलासा त्यांनी केला.

जरांगेंच्या मुंबईत येण्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

लोकशाहीत आंदोलन (Agitation) करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणालाही रोखणार नाही. मात्र त्याचवेळी आता हिंदूंचा सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव आहे. या सणात कोणतेही विघ्न येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...