Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : अंबादास दानवेंच्या 'त्या' ट्विटला CMO कार्यालयाचे प्रत्युत्तर; म्हणाले, "ती...

Maharashtra News : अंबादास दानवेंच्या ‘त्या’ ट्विटला CMO कार्यालयाचे प्रत्युत्तर; म्हणाले, “ती माहिती…”

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मदत देण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत निधी देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून करण्यात आले होते. तसेच, या मदतनिधीमधून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचेही सांगण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानंतर याच मुख्यमंत्री सहायता निधीबाबत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज (गुरुवार) सकाळी एक ट्विट करत देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण, राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा सवाल विचारला होता. यानंतर आता त्यांच्या ट्विटला सीएमओ कार्यालयाने उत्तर दिले आहे.

YouTube video player

CMO कार्यालयाने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

श्री अंबादास दानवे जी,

एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून १४,००० कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भास्कर जाधवही सरकारवर बरसले

सध्या नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात आज शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी अनुदान यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पुनर्वसन कसे करणार, याची स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान ज्या प्रमाणात झाले आहे, त्याप्रमाणे मदत दिली नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्य-मरणाच्या प्रश्‍नांवर चर्चा सुरू असताना मंत्री जातात कुठे? यावर सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...