Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा...

Maharashtra News : राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर आरोप

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली चोक्कलिंगम यांची भेट

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मंगळवारी केला. नावे वगळण्याचा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) संपूर्ण कारभार संशयास्पद असून मतदानाचा हक्क हिरावून घेत लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा मोठा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (Congress Delegatsion) आज एसआयआरच्या प्रश्नावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु आहे. आयोगाच्या कारभारात कोणतीही पारदर्शकता नसल्याचे सांगत सपकाळ यांनी संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ, बुथनिहाय प्रसिद्ध करून दावे आणि हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली.

राज्यात मतदारांची (Voter) संख्या ९ कोटी ७८ लाख होती. यातून ३ कोटी २८ लाख मतदारांना वगळले तर साडेसहा कोटी मतदार राहतात. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असल्याचे आणि प्रौढ लोकसंख्या १० कोटीच्या वर असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. या आकडेवारीनुसार १० कोटी मतदार असायला हवेत. पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ते साडेसहा कोटीच आहेत. तर मग सरकारच्या विभागातील आकडे वेगवेगळे कसे? असा सवाल सपकाळ यांनी केला.

ज्यांच्याविषयी संभ्रम आहे, अशा मतदारांची संख्या १ कोटी २२ लाख आहे. या मतदारांना निवडणूक आयोगाने नोटीसा बजावलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व संशयित मतदारांची यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, मतदारसंघ, बुथनिहाय प्रसिद्ध करायला हवी. पण आयोगाने तसे केलेले नाही. एसआयआरच्या माध्यमातून लाखो मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या कित्ता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरवत आहेत, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

ताज्या बातम्या