Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : काँग्रेसची प्रचार समिती गठीत; 'या' नेत्याची अध्यक्षपदी नियुक्ती

Maharashtra News : काँग्रेसची प्रचार समिती गठीत; ‘या’ नेत्याची अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) काँग्रेसने प्रचार समिती गठीत केली असून समितीच्या अध्यक्षपदी राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत ४५ सदस्यांचा समावेश असून समितीच्या समन्वयकपदाची जबाबदारी नाना गावंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

निवडणूक प्रचार समितीच्या (Election Campaign Committee) सदस्यांमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, सुरेश शेट्टी, माजी खासदार हुसेन दलवाई, कुमार केतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार – कडलग

तसेच आमदार भाई जगताप, अभिजीत वंजारी, प्रज्ञा सातव, चारुलता टोकस, उल्हास पवार, मोहन जोशी, अनिस अहमद, अशोक पाटील, चरणसिंह सप्रा, राजाराम पानगव्हाणे, रामहरी रुपनवर, मुनाफ हकीम, एम. एम. शेख, राजेश शर्मा, सचिन सावंत, शरद अहेर, महेंद्र घरत, किशोर बोरकर, जेनेट डिसुझा, इब्राहिम भाईजान, कमल फारुकी, अनिषा बागुल, सूर्यकांत पाटील, डॉ. हेमलता पाटील, मोहन देशमुख, प्रवीण देशमुख, सुनील अहिरे, अनिस कुरेशी, अशोक धवड यांचेही प्रचार समितीत नाव आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : मांजरपाड्याच्या पाण्याने नांदगाव तालुका समृद्ध करणार; मांडवड, भालूर प्रचारदौऱ्यात समीर भुजबळ यांची ग्वाही

दरम्यान, या प्रचार समितीची पहिली बैठक (Meeting) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या