Tuesday, May 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

Maharashtra News : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

राज्यातील शेतकरी (Farmer) संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने (State Government) पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत बोलताना केली.

बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे (Congress) सरकार असताना अनेकदा केले गेले. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतकऱ्याला मदत दिली आहे. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नसल्याने सरकारने कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. याशिवाय अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे आणि खते द्यावीत, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

मुसळधार पावसाने भाजप युती सरकारचे (Yuti Government) सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसाने उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजप शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. मग याकाळात भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले, अशी विचारणा करत  सरकारने आरोप -प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी, असा सल्ला सपकाळ यांनी दिला.

महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ (Cabinet) मात्र अमित शहा (Amit Shah) यांची खुशामत करण्यात मग्न आहे. शहा यांनी  निवडणूक प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार असल्याच्या वल्गना  केल्या होत्या. त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसतो. अमित शहा महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विश्वास उटगी यांचा प्रवेश

दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उटगी यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : पाणीपट्टीत दहा टक्के वाढ होणार? जलसंपदाकडून मनपाला मिळणारे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा (Water Supply) करण्यासाठी नाशिक महापालिका (Nashik NMC) जलसंपदा विभागाकडून पाणी आरक्षित करून त्या बदल्यात वर्षाला सुमारे २४...