Tuesday, May 6, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : चौंडीच्या मंत्रिपरिषदेत धनगर आरक्षणावर चर्चा ?

Maharashtra News : चौंडीच्या मंत्रिपरिषदेत धनगर आरक्षणावर चर्चा ?

मुंबई  | Mumbai

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिपरिषदेची विशेष बैठक आज, मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चौंडी येथे होत आहे. या बैठकीत धनगर समाजाच्या बहुप्रतिक्षित अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय चौंडी आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला अभूतपूर्व जनादेश मिळाला. या निवडणुकीत राज्यभरातील धनगर समाज भाजपच्या बाजूने उभा राहिलेला दिसला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र चौंडी येथे आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे,अशी मागणी सातत्याने धनगर समाजाकडून सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने तसा ठराव केंद्र सरकारला पाठवला आहे. मात्र, धनगर आरक्षणाची मागणी प्रलंबित असताना राज्य सरकारने अनुसूचित जमातीला मिळणाऱ्या शासकीय लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्य मंत्रिपरिषदेवी बैठक होत असल्याने या बैठकीत काही मंत्र्यांकडून धनगर आरक्षणाला महादस्थित केला जाऊ शकतो.

आरक्षणाचा ठराव करावा

चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देणारा ठराव मंजूर करावा. हा ठराव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाकडून करण्यात आली आहे. आरक्षणाचा निर्णय घेतल्यास अहिल्यादेवींच्या विचारांचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार असल्याची भूमिका अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India-Pakistan Tension : युद्धाचे ढग गडद; हवाई हल्ल्याची तयारी, उद्या देशभर...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय...