मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या (Vidhansabha Election) तीन महिन्यांनी विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) रिक्त असलेल्या पाच जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. या ०५ जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे आमश्या पाडवी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विधान परिषदेतील एकूण पाच आमदार विधानसभेवर (Vidhansabha) निवडून गेल्याने रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेचा (Shinde Shivsena) एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा (NCP Ajit Pawar) एक आणि भाजपच्या (BJP) तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे.
त्यानुसार १० मार्च ते १७ मार्च या कालावधीत विधान परिषदेसाठी अर्ज भरता येणार आहे.तर १८ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तसेच २० मार्च रोजी उमेदवारांना (Candidates) अर्ज मागे घेता येणार असून २७ मार्च रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान (Voting) होणार आहे. त्यामुळे आता या रिक्त जांगावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.