Monday, May 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Bhavan Fire : मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; परिसरात धुराचे लोट

Vidhan Bhavan Fire : मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; परिसरात धुराचे लोट

मुंबई | Mumbai 

- Advertisement -

आज दुपारच्या सुमारास अचानक विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी विधानभवन परिसरात आमदार आणि खासदार (MLA and MP) उपस्थित होते. एका कार्यक्रमानंतर ते भोजनासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली.

दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामा करण्यात आला असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

पाकिस्तान हेरगिरीच्या आरोपांदरम्यान ज्योती मल्होत्राच्या सोशल मिडीया अकाउंटवर स्ट्राईक; मेटाने इंन्स्टाग्राम...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या असून ती पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. आता ज्योतीला पहिला...