Wednesday, April 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Bhavan Fire : मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; परिसरात धुराचे लोट

Vidhan Bhavan Fire : मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; परिसरात धुराचे लोट

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

मुंबई | Mumbai 

आज दुपारच्या सुमारास अचानक विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी विधानभवन परिसरात आमदार आणि खासदार (MLA and MP) उपस्थित होते. एका कार्यक्रमानंतर ते भोजनासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली.

दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामा करण्यात आला असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरण; सात आरोपींविरूध्द सुमारे 850 पानी दोषारोपपत्र...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटकेत असलेल्या सात संशयित आरोपींविरूध्द जामखेड न्यायालयात सुमारे...