Friday, April 25, 2025
HomeनाशिकMaharashtra News : नाशिकमध्ये महाजन, रायगडमध्ये तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण

Maharashtra News : नाशिकमध्ये महाजन, रायगडमध्ये तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नाराजीमुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या (Nashik and Raigad Districts) पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवली असली तरीही प्रजासत्ताकदिनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन, आदिती तटकरे (Aditi Tatkare) हेच राष्ट्रध्वजारोहण करणार असल्याचे आज (सोमवारी) स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नसतानाही या दोघांना २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला आहे.

- Advertisement -

दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्हा पालकमंत्रिपदाची (Guardian Minister) यादी जाहीर केली. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप आमदारांचा विरोध असतानाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली. या नियुक्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहे. या स्थगितीमुळे प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण (Flag Hoisting) कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या (General Administration Department) राजशिष्टाचार विभागाने आज शासन परिपत्रक काढून नाशिक आणि रायगड जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन (Girish Mahajan) आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण होईल, असा खुलासा केला आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच भरतशेठ गोगावले यांना नवा आदेश येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...