Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDr Deepak Tilak : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Dr Deepak Tilak : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे | Pune

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ.दीपक जयंत टिळक (Dr.Deepak Tilak) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले असून टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेला. तसेच डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे (Maharashtra University) कुलगुरू देखील होते. तर २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

दरम्यान, डॉ. दीपक टिळक यांचे वडील स्वर्गीय जयंतराव टिळक (Jayantrao Tilak) हे १२ वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते. तर डॉ. दीपक टिळक यांच्या आई स्वर्गीय इंदुताई टिळक या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सेवासदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या.

ताज्या बातम्या

default-featured-image

Rohit Pawar : गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिला नाही; रोहित पवारांचा राज्य...

0
नाशिक | Nashik राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती गंभीर बनली असून, गृहखात्याचा पोलिस (Police) प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादी...