Monday, May 12, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; CM फडणवीसांनी...

Maharashtra News : राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai 

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात युद्धबंदी झाली असली तरी भारतावरील (India) धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अजूनही भारताने सावध भूमिका घेतांना दिसत आहे. भारतीय लष्कराचे (Indian Army) तिन्ही दल सीमेवर कार्यरत असून, राज्याच्या सीमाही सुरक्षित राहाव्या यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संरक्षण दल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “सध्याच्या युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती. पण सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांशी आपण बैठक घेतली नव्हती. आजच्या बैठकीत या दिवसांमध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आत्ताही आपण कसे सतर्क राहायला हवे यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतले”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदुर (Operation Sindoor) राबविले, ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्वपूर्ण असून, भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर (Mumbai) हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे. त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आजची बैठक (Meeting) आम्ही घेतली”, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच “येणार्‍या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारचे (State Government) वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी (Officers) मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करुया”, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या बैठकीस भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा (Gujarat and Goa) क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदलाचे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे डीजीपी, गृह आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही देखील उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Indian Army PC : “आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने….”;...

0
दिल्ली । Delhi भारत आणि पाकिस्तानमधील तणावग्रस्त संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या वळणावर येताना दिसत आहेत. सोमवारी दोन्ही देशांचे डीजीएमओ (Director General of Military Operations) म्हणजेच...