Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : शिवनेरीच्या पायथ्यावरुन मनोज जरांगेंनी सरकारची 'ती' अट केली...

Manoj Jarange Patil : शिवनेरीच्या पायथ्यावरुन मनोज जरांगेंनी सरकारची ‘ती’ अट केली मान्य; नेमकी कोणती भूमिका घेतली?

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. काल (दि.२७ ऑगस्ट) रोजी त्यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज मनोज जरांगे यांनी शिवनेरी गडावर (Shivneri Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर ते मुंबईकडे मार्गस्थ झाले. सध्या ते नारायणगावमध्ये पोहोचले आहेत. पंरतु, जरांगे यांनी आज सकाळी शिवनेरीवर सरकारची मोठी अट मान्य केली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगेंनी आज शिवनेरीच्या (Shivneri) पायथ्याशी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सरकारने (Government) आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीचे स्वागत आहे, पण मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करणार आणि शासनाने ठरवलेल्या नियमांचे पालन करणार. हातातोंडाशी आलेला घास काढून घेऊ नका, पण शांतता राखा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

YouTube video player

तसेच मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानावर (Aazad Maidan) फक्त पाच हजार आंदोलकांनाच येता येईल, अशी अट मनोज जरांगेंना घालण्यात आली आहे. त्यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “शासनाची पाच हजाराची अट आम्हाला मान्य आहे. ते लोक पाच हजार म्हणतात, आम्ही चार हजार लोक आंदोलनाला बसू. इतर लोक दुसऱ्या मैदानात बसू, पण मागे हटणार नाही”, असेही त्यांनी म्हटले.

मुंबई पोलिसांची जरांगेंना अटी शर्तींसह आंदोलनास परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी दिली. यात एक दिवस म्हणजेच दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे.

.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...