Tuesday, September 8, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra News : गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मंत्री मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक

Maharashtra News : गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मंत्री मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

पुढील महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी उद्या (मंगळवारी) मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. दुपारी अडीच वाजता नाना चौक येथील मुंबई महापालिकेच्या (Mumbai Mahapaliak) डी विभागाच्या दुसरा मजल्यावरील सभागृहात आयोजित बैठकीत गणेशोत्सवाच्या आयोजनावर चर्चा होणार आहे.

- Advertisement -

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव (Public Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात विविध मंडळाचे गणपती विसर्जनासाठी येतात. त्याअनुषंगाने प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. याबाबत सुसूत्रीकरण आणि समन्वय असणे आवश्यक आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे योग्य नियोजन, समन्वय तसेच गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने या संयुक्त बैठकीचे (Meeting) आयोजन करण्यात आले आहे. मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik फुलेनगरातील सागर जाधव (Sagar Jadhav) याच्यावर झालेल्या गोळीबार व हत्येचा कट रचल्यामागील सूत्रधार मानला जाणारा अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central...