Monday, March 31, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : राज्यात म्हाडा वर्षभरात १९ हजार ४९७ घरे बांधणार;...

Maharashtra News : राज्यात म्हाडा वर्षभरात १९ हजार ४९७ घरे बांधणार; १५ हजार ९५१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

नाशिक मंडळाअंतर्गत 'इतकी' घरे बांधली जाणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात (Budget) ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ सदनिकांचे बांधकाम (Construction) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९ हजार २०२ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्राधिकरणाच्या (Authority) २०२५-२०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली. यात मुंबई मंडळाअंतर्गत (Mumbai Board) ५१९९ घरे बांधली जातील. त्यासाठी ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद आहे.

तसेच कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ घरे बांधली जातील. त्यासाठी १४०८.८५ कोटी, पुणे मंडळाअंतर्गत १८३६ घरे बांधली जाणार असून त्यासाठी ५८५.९७ कोटींची तरतूद आहे. तर नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ घरे बांधली जाणार असून त्यासाठी १००९.३३ कोटी आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ घरे (House) बांधली जाणार असून यासाठी २३१.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, याशिवाय नाशिक मंडळाअंतर्गत (Nashik Mandal) ९१ घरे बांधली जाणार असून त्यासाठी ८६ कोटींची तरतूद केली गेली आहे. तर अमरावती मंडळाअंतर्गत १६९ घरे बांधली जाणार असून, ६५.९६ कोटी तरतूद आहे. म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 MI vs KKR : आज मुंबई-कोलकाता लढत; MI विजयाचे...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) सायंकाळी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट...