Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPankaja Munde PA Anant Garje : "मला अनंतचा फोन आला, तो खूप…";...

Pankaja Munde PA Anant Garje : “मला अनंतचा फोन आला, तो खूप…”; मंत्री मुंडे पीएच्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणावर स्पष्टच बोलल्या

मुंबई | Mumbai

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje) यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी वरळी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, गौरीच्या आई-वडिलांनी तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून (Pankaja Munde Office) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, “काल दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजेच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे”, असे त्यात सांगण्यात आले आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Pankaja Munde PA Anant Garje : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर अनंत गर्जेंनी सगळंच सांगितलं; म्हणाले, “मी ३१ व्या मजल्यावरून…”

दरम्यान, वरळी पोलिसांनी (Warli Police) काल (शनिवारी) संध्याकाळी गौरी पालवे-गर्जे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. परंतु, त्यानंतर गुन्हा दाखल झाला नव्हता. काल रात्रीपासून गौरी गर्जे यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आज (रविवारी) सकाळी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला.

अनंत गर्जेंचे म्हणणे काय?

डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांकडून लावण्यात आलेल्या आरोप अनंत गर्जे यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी परतलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. कितीही आवाज दिला तरी प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे मी घाबरलो आणि धाडस करुन ३१ व्या मजल्यावरुन ३० व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घरात दाखल झालो तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्या क्षणी मी पूर्णत: हादरलो. यानंतर गौरीला खाली उतरवून मी तातडीने रुग्णालयात नेलं”, असा दावा अनंत गर्जे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

Malegaon MC Politics : महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएमची उडी; नाट्यमयरित्या अर्ज...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर...