Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयSushil Kedia : राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात; उद्योजक सुशील केडियांचे...

Sushil Kedia : राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात; उद्योजक सुशील केडियांचे ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

मुंबई | Mumbai

इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणारा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर आज शनिवारी (दि.५) उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे यांची भाषणं हे मुख्य आकर्षण आहे. दुसरीकडे सुशील केडिया नावाच्या व्यावसायिकाने तीस वर्षांपासून मुंबईत राहतो पण मराठी येत नाही असे ट्विट करत राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता.

- Advertisement -

त्यानंतर आता उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं आहे. सुशील केडिया यांचं ऑफिस नारळ फेकून फोडण्यात आलं आहे. माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडल्याची माहिती, मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. तसेच आज आम्ही केडियाचं ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही घाबरणार नाही. सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर पोलिसांनी या मनसेसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

YouTube video player

कोण आहे सुशील केडिया?

सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे. शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी २५ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे.

विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, चिन्मयी राघवन, अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव वरळीतील डोममध्ये दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...