नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (Maharashtra Medical Council ) ९ जागांसाठी आज (दि.०३ एप्रिल) रोजी मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, न्यायालयात (Court) दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (High Court) या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याने दुपारी एक वाजता तातडीने प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे मतदान (Voting) पूर्ण होऊ शकले नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ९ जागांसाठी दि.३ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ०९ वाजेपासून या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला होता. या निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला सचिव दर्जाचा अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी नसल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर आज (दि.०३ एप्रिल रोजी) सुनावणी (Hearing) होणार होती. तसेच मतदानही तीन तारखेला होणार होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेबाबत काहीच सूचना दिली नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज (गुरुवारी) सकाळी मतदान प्रक्रिया नियमितपणे सुरू केली होती. मात्र,आज (गुरुवारी) सकाळी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे दुपारी ०१ वाजता राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया थांबवण्यात आली. यानंतर न्यायालयाच्या पुढील निर्देशानंतर त्यावर कारवाई केली जाईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक शहरातील (Nashik City) बी.डी.भालेकर शाळेतील सात मतदान केंद्रांवर (Polling Stations) हे मतदान घेण्यात आले होते. जिल्ह्यातील आरोग्य परिषदेचे ४ हजार ३०१ सभासद मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याने तयारी करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्याने तातडीने प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यावेळी नऊ टक्के मतदान झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.