Friday, May 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी; पण पोलिसांनी ठेवली 'ही'...

मोठी बातमी! मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी; पण पोलिसांनी ठेवली ‘ही’ अट

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी अंतरवाली सराटीपासून आज (बुधवारी) सकाळी १० वाजता मुंबईकडे कूच केली आहे. उच्च न्यायालयाने जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

- Advertisement -

यानंतर आता मनोज जरांगे यांच्या उपोषणास मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवस आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. तसेच त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला (Protest) परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ” एका दिवसात जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत असेल तर त्यांच्या अटी आम्हाला मान्य आहेत. आम्हाला जर एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली तर सरकारने एका दिवसात आरक्षण द्यावं. पण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उठणार नाही”, असे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी घातलेल्या अटी खालीलप्रमाणे

  • आंदोलनाला फक्त एका दिवसाची परवानगी असेल. तर शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही.
  • वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त ५ गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील. ठराविक वाहनांनाच परवानगी असेल.
  • आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहिल.
  • आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
  • परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत.
  • आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही.
  • आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
  • आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही.
  • आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.

ताज्या बातम्या