Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रकितीही प्रयत्न केले तरी...; शेतकरी आत्महत्येवरुन जयंत पाटलांची सरकारवर टिका

कितीही प्रयत्न केले तरी…; शेतकरी आत्महत्येवरुन जयंत पाटलांची सरकारवर टिका

मुंबई | Mumbai

राज्यात उशीरा दाखल झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे हाताशी आलेले पीक करपू लागले आहे. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी संकटात सापडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. शेतकरी आत्महत्या (Farmers Suicide) रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे.

- Advertisement -

कितीही प्रयत्न केले तरी आताच्या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’ पुसता येणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकरी आत्महत्येंनी उच्चांक गाठला असून सर्वाधिक आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात आहेत.

G-20 Summit India: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे; जी-२०चे पुढचे अध्यक्षपद ब्राझीलकडे

ट्विटरवर आपले मत व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, “एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी २ ते ३ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, यंदा राज्यात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी पिके शेतातच जळून गेलीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट

मागील तीन वर्षात तब्बल २ हजार ६८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मराठवाड्यातील ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात मराठवाड्यातील १०२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात यंदा हवा तसा पाऊस पडलेला नाही. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पावसा अभावी पिके शेतातच जळून गेलीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच कर्ज देखील वाढत चालले आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या