Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; एका गोविंदाचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra News : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; एका गोविंदाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई | Mumbai

राज्यभरात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा (Dahi Handi) उत्साह बघायला मिळत आहे. तर मुंबई, ठाण्यात (Mumbai and Thane) अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अनेक गोविंदा (Govinda) पथक आणि हजारो गोविंदा यात सहभागी झाले आहेत. मात्र, अशातच मुंबईत दहीहंडी उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

मुंबईतील मानखुर्दमध्ये बाल गोविंदा पथकातील ३२ वर्षीय गोविंदाचा मृत्यू (Death) झाला आहे. तर मुंबईतील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ३० गोविंदा जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर विविध सरकारी तसेच बीएमसी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. १५ गोविंदांवर खासगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, १५ गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

YouTube video player

मानखुर्दच्या (Mankhurd) महाराष्ट्र नगरमध्ये बाल गोविंदा पथकातील जगमोहन चौधरी (वय ३२) हा गोविंदा दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने खाली पडला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेने मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, सर्व गोविंदा पथकातील गोविंदाना नेहमी राज्य सरकारकडून (State Government) आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. तसेच दहीहंडी हा आनंदाचा उत्साह असल्याने अतिशय सावधपणे थर रचून दहीहंडी फोडण्याचे आवाहन केले जाते. दरवर्षी गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. त्या जखमींचा खर्च राज्य सरकारकडून केला जातो.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...