Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : औरंगजेबाच्या कबरीचा राष्ट्रीय संरक्षित स्मारक दर्जा काढण्यासाठी मुंबई हायकोर्टात...

Maharashtra News : औरंगजेबाच्या कबरीचा राष्ट्रीय संरक्षित स्मारक दर्जा काढण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका

नाशिक | Nashik

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील औरंगजेबाच्या कबरीला (Tomb of Aurangzeb) दिलेल्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक (National Protected Monument) दर्जावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हा दर्जा काढण्यासाठी नाशिक येथील रतन लथ यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

सदर याचिकेत लथ यांनी असा दावा केला आहे की, “संबंधित कबर १९५२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, काही नागरिक आणि संघटनांचा यावर आक्षेप असून, या कबरीला दर्ग्याचा दर्जा देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे देशप्रेमी मुस्लिम समाज (Muslim Society) अडचणीत आला आहे”, असे रतन लथ यांनी म्हटले आहे.

लथ याचिकेत पुढे म्हणाले की,”ज्याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले, त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो आपला बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. जरी भारतात त्याचा जन्म झाला असेल, तरी देशासाठी (Country) त्याने काहीही केले नाही. त्याचा इतिहास बघितला तर एकही चांगली गोष्ट त्याने केलेली नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच “विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र, हा दर्जा हटवल्यास महापालिका (NMC) बुलडोझर लावून ती काढू शकते. उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का? असे म्हणत लथ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत औरंगजेबाची जी काही माती असेल ती त्याच्या देशात पाठवा”, असेही रतन लथ याचिकेत (Petition) म्हणाले आहेत.

दरम्यान, या याचिकेवर मुंबई हायकोर्ट काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विशेष दर्जा हटवण्याची मागणी (Demand) मान्य झाल्यास पुढील कारवाई (Action) कशी होते, यावर मोठी चर्चा रंगली आहे.

गरज नसताना वाद उकरला जातोय – लथ

मी हिंदू नाही, पण पारशी आहे आणि देशप्रेमी आहे. औरंगजेब हा क्रूर होता. त्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा छळ केला. अशा व्यक्तीच्या कबरीला दर्ग्याचा दर्जा देणे चुकीचे असून गरज नसताना वाद उकरला जात आहे, असे रतन लथ यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...