Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत...

Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

कॅश व्हॅनमधून डिलिव्हरी

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सध्या आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) सुरू असून नाशिक शहरासह ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) केलेल्या चोख नाकाबंदीत दोन कोटी ३१ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. कसारा घाटाच्या (Kasara Ghat) पायथ्याशी एका कारमध्ये दोन कोटी तर उपनगरसह सातपूरमध्ये ३१ लाख ५० हजारांची बेहिशेबी रक्कम मिळाली. उपनगरात बिगारी कामगाराच्या घरातून ११ लाख तर सातपूरमध्ये नाकाबंदीवेळी वाहनातून २० लाख ५० हजार हस्तगत केले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख

दरम्यान, या बेहिशेबी रकमेच्या वाहतुकीत (Transport) खासगी ‘कैश व्हॅन’चा वापर वाढत असल्याचे दिसत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरातील चीकांत स्थिर सर्वेक्षण पथकाची (एसएसटी) नाकाबंदी तैनात असून विविध ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. यासह प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय व गुन्हे शोध पथकांची बेहिशेबी रक्कम, अवैध दारू विक्री व वाहतुकीसह प्रतिबंधात्मक कारवायांसाठी विशेष लक्ष आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : प्रवाशांचे दागिने चोरणारा गजाआड

त्यानुसार सातपूर पोलिस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत पिंपळगाव बहुला येथे ‘एसएसटी’ नाकाबंदीवेळी पोलिसांनी कॅश व्हॅन (एमएच १४ केए ५१८४) अडवली. या वाहनात २० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम होती. त्यामध्ये पाचशे रुपयांचे ३८ बंडल, दोनशे रुपयांचे पाच बंडल आणि शंभर रुपयांच्या पाच बंडलांचा समावेश आहे. या वाहनाचा वाहनचालक संशयित महेश शरद गिते याच्याकडे रकमेसंदर्भात पोलिसांनी (Police) चौकशी केली. त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी रक्कम जप्त करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मजुराकडे ११ लाख

बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचे पथक संशयित ऋषिकेश माधव वानखेडे (रा. माणिकनगर, भालेराव मळा, जयभवानी रोड) याच्या घरी पोहोचले. त्याच्या घरझडतीमध्ये १९ लाख रोख रक्कम पोलिसांना सापडली, त्यानुसार संशयिताला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कसारा घाटाजवळही कारवाई

नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याशी पोलिसांच्या नाकाबंदीत एका वाहनातून तब्बल दोन कोटींचे घबाड मिळाले असून पोलिसांनी रोख रकमेसह वाहन ताब्यात घेतले आहे. कसारा घाटातील चिंतामणवाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी नाकाबंदी केली होती. यावेळी नाशिकहून मुंबईकडे जाणारी एमएच ११ बीव्ही ९७०८ या कारची तपासणी केली असता दोन कोटींची राक्रम आढळून आली. राक्रम व वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन्न भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू होते.

राज्यात १८७ कोटींची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आवारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, क्रूज आणि मौल्यवान धातू इत्यादी अशी एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने बुधवारी दिली, प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाकडून सुमारे ७५ कोटी रुपये, प्राप्तिकर विभागाकडून सुमारे ६० कोटी रुपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पालघर, भिवंडीत सव्वाचार कोटी जप्त

अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेकपोस्टवर ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथे एका बँकेतून दूसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असे सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. तसेच भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील तळवली नाका परिसरातदेखील एका कारमध्ये रोख रक्कम पकडण्यात आली असून पंचनामा करून ३ लाख २५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या