Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप तीव्र; उद्यापासून तातडीची सेवा बंद...

Maharashtra News : महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप तीव्र; उद्यापासून तातडीची सेवा बंद करण्याचा इशारा

पुणे | प्रतिनिधी | Pune

राज्यात निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला संप (Strike) आता अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. काल रात्री १२ वाजेपासून राज्यभरात सुरू झालेल्या या संपामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून, उद्यापासून आपत्कालीन सेवा आणि ओपीडी बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी (Doctors) दिला आहे.

- Advertisement -

१३ हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी

 या आंदोलनात राज्यातील सुमारे १३ हजार वैद्यकीय निवासी डॉक्टर्स, इंटर्न्स, रेसिडेंट डॉक्टर्स आणि सीनियर रेसिडेंट्स पूर्णपणे सहभागी झाले आहेत. यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील (Hospitals) रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे.

शासकीय उदासीनतेवर नाराजी 

डॉक्टरांनी पुकारलेल्या या आंदोलनानंतरही (Protest) सरकार आमच्याशी संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाही. प्रशासनाकडून आम्हाला अजूनही चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. सरकारच्या या उदासीन यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे डॉ अथर्व शिंदे यांनी सांगितले.

उद्यापासून आणीबाणी सेवाही ठप्प होणार 

आज राज्यभरात सर्व सामान्य ओपीडी बंद ठेवून डॉक्टरांनी निषेध नोंदवला. मात्र, प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने उद्यापासून हे आंदोलन अधिक उग्र केले जाणार आहे. त्यानुसार, उद्यापासून अत्यावश्यक/आणीबाणी सेवा  देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या संपामध्ये एमबीबीएस आणि ॲलोपॅथीचे सर्व निवासी डॉक्टर्स सहभागी झाले असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...