Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं; प्रकरण काय?

Maharashtra News : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं; प्रकरण काय?

सोलापूर | Solapur

संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला अक्कलकोट (Akkalkot) येथे काळं फासण्यात आले आहे. गायकवाड यांनी स्वामी समर्थांविषयी अपशब्द वापरले. तसेच संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला असा आरोप करत शिवधर्म फाउंडेशनच्या (Shivdharma Foundation) शिवभक्तांनी हे कृत्य केले.

- Advertisement -

प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) आज (रविवारी) अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई ओतली. गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाली होती. तसेच, स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.

यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते. तर राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच “जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) एकेरी उल्लेख थांबवला नाही, तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांना सत्कार समारंभाच्या ठिकाणीच काळे फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. तसेच त्यांना गाडीतून बाहेर खेचत धक्काबुक्की देखील करण्यात आली. त्यांचे कपडेही फाडण्यात आले. यावेळी ते हात जोडून सर्वांची माफी मागताना दिसून आले. या घटनेनंतर इंदापूरच्या (Indapur) शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून,प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणावर अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज्या बातम्या