मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल शनिवारी जाहीर झाले.या निवडणुकीत महायुतीला २३६ तर मविआला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये महायुतीमधील भाजपला १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर मविआतील काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-व इतरांना १२ जागा मिळाल्या आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी
यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून नुकतीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईत (Mumbai) अजित पवारांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार (MLA) उपस्थित होते. त्यानंतर या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा