Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार; आयकर विभागाने बजावली ...

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार; आयकर विभागाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महायुती सरकारमधील (Mahayuti Government) शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat ) यांना छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेलप्रकरणी आयकर विभागाची नोटीस आली आहे. मंत्री शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस आल्याची कबुली दिली आहे. तसेच आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत. हे विधान फक्त माझ्यासाठीच आहे, असेही त्यांनी म्हटले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) तुमची संपत्ती इतकी होती, आता २०२४ च्या निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असा सवाल आयकर विभागाकडून संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. ९ तारखेपर्यंत पैशांबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमात म्हटले. तसेच पैसे कमवणे सोपं आहे, मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचे देखील संजय शिरसाट यांनी म्हणाले आहेत.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांना विटस हॉटेल (Hotel Vits) प्रकरणात आयकर खात्याची नोटीस आल्याने त्यांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार का? किंवा त्यांची चौकशी केली जाणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधातच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि त्यापाठोपाठ आयकर खात्याने नोटीस बजावल्याने महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिरसाट यांच्यावर विट्स हॉटेल प्रकरणावरून गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये असतानाही, केवळ ६७ कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, विरोधकांनी हा विषय लावून धरला होता. तसेच पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली होती.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...