Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : ज्योतिर्लिंग विकासाला गती; त्र्यंबकेश्वरची सूत्रे सौरभ विजय यांच्याकडे

Maharashtra News : ज्योतिर्लिंग विकासाला गती; त्र्यंबकेश्वरची सूत्रे सौरभ विजय यांच्याकडे

मुंबई | Mumbai

राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या पाच विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरची (Trimbakeshwar Temple) जबाबदारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय (Saurabh Vijay) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या कामांचा नियमितपणे आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल विकास आराखड्यांतील मुख्यमंत्र्यांना सादर करतील.

YouTube video player

विकास आराखड्यांना मंजुरी आणि निधी

या पाचही ज्योतिर्लिंगांसाठी उच्चाधिकार समित्यांच्या बैठकांमध्ये विकास आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. या आराखड्यांमध्ये कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोणत्या देवस्थानला किती निधी?

त्र्यंबकेश्वर : २७५ कोटी रुपये

घृष्णेश्वर : १५६ कोटी ६३ लाख रुपये

भीमाशंकर : १४८ कोटी ३७ लाख रुपये

औंढा नागनाथ : १५ कोटी २१ लाख रुपये

परळी वैजनाथ : २८६ कोटी ६८ लाख रुपये

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...