Tuesday, June 3, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 'हे' चार मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ चार मोठे निर्णय

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरण, राज्य कामगार विमा महामंडळासाठी रुग्णालयांना (Hospital) जमीन आणि MSRDC ला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे

१) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)

२) धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता (महसूल विभाग)

३) राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता (महसूल विभाग)

४) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या वस्तीवर रात्री १२ वाजेच्या सुमारास गोठ्यात शिरून वासरावर (Calf)...