Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

Maharashtra News : ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ तर चार जिल्ह्यांत सर्वात कमी तीन केंद्रे

मुंबई | Mumbai

मतदान (Voting) प्रक्रियेतील महिलांचा (Women) सहभाग वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) आदेशानुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात आले असून यावेळी राज्यातील ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती असणार आहेत. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : देवळाली मतदारसंघात आ. सरोज आहिरेंचा झंझावात

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात (Polling Station) कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

जिल्हानिहाय केंद्र

अहमदनगर १२
अकोला ०६
अमरावती ०८
छत्रपती संभाजीनगर १३
भंडारा ०८
बीड ०८
बुलढाणा ०७
चंद्रपूर ०९
धुळे ०५
जालना ०६
कोल्हापूर १०
लातूर ०६
मुंबई शहर १२
नागपूर १३
नांदेड ०९
नंदुरबार ०४
उस्मानाबाद ०४
पालघर ०६
परभणी ०८
रायगड ०९
सांगली ०८
ठाणे १८
पुणे २१
रत्नागिरी ०६
सातारा १७
वर्धा०९

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा























- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या