Tuesday, May 14, 2024
Homeनगरपोलीस शिपाई पदासाठी 521 उमेदवारांनी दिली चाचणी

पोलीस शिपाई पदासाठी 521 उमेदवारांनी दिली चाचणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन दिवस पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी पार पडल्यानंतर बुधवारपासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्येक्षात 604 मुलांनीच चाचणीसाठी हजेरी लावली. त्यातील 83 मुलांना उंची, छातीमध्ये अपात्र ठरविण्यात आले तर उर्वरित 521 जणांनी चाचणी दिली. दरम्यान पहिल्याच दिवशी पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीसाठी 396 उमेदवारांनी दांडी मारल्याचे दिसून आले.

- Advertisement -

पोलीस भरतीला नगरमध्ये सुरूवात

पोलीस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून सुरू झाली आहे. 2 व 3 जानेवारीला पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. बुधवारी पहाटे पाच वाजेपासून पोलीस शिपाई पदाच्या 129 जागेसाठी चाचणीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक दिवशी एक हजार मुलांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.

पोलीस भरती : दुसर्‍या दिवशी 278 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

येथील पोलीस मुख्यालय मैदानावर चाचणी घेण्यात येते. केवळ 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था केली आहे. येथील मैदानावरून अरणगाव येथे जाण्यासाठी पोलीस व्हॅन ठेवण्यात आल्या आहे. स्वत: पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, अंमलदार यांचा बंदोबस्त चाचणीसाठी तैनात करण्यात आला आहे.

पोलीस भरती : मैदान सज्ज !

मैदानी चाचणीसाठी येणार्‍या मुलांनी पोलीस मुख्यालय परिसर गजबजला आहे. पहाटे पाच वाजेपासून भरती उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जातो. तेथे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यानंतर छाती आणि उंचीचे मोजमाप केले जाते. यामध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितले जाते. यानंतर पात्र उमेदवारांची चाचणी घेण्यात येते. गोळा फेक, 100 मीटर धावणे झाल्यानंतर 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात नेले जाते. बुधवारी 521 उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. आज, गुरूवार एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.

मंत्री विखेंचा जिल्हा नामांतराला विरोध

- Advertisment -

ताज्या बातम्या