Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटात शेकडो नगरसेवक होणार सामील?नाशकातील नगरसेवकांच्या नावांचीही चर्चा

शिंदे गटात शेकडो नगरसेवक होणार सामील?नाशकातील नगरसेवकांच्या नावांचीही चर्चा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील राजकारणातील सर्वात मोठे बंड करून राजकारणाला हादरवून सोडणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. आमदारांच्या प्रतिसादानंतर आता मुंबई (Mumbai), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali), वसई विरार (vasai virar), ठाणे महापालिकेतील (Thane municiple corporation) शेकडो नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे….(maharashtra political crises over four hundred corporatores will join eknath shinde group)

- Advertisement -

विशेष म्हणजे, एकेकाळी शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या नाशिक मनपामधीलही (Nashik nmc) काही नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते….

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 37 हून अधिक आमदार (MLA) आहेत. यासोबतच अपक्ष मिळून हा आकडा ४५ पेक्षा अधिक झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे काही खासदारदेखील शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

आज सायंकाळी मातोश्रीवर (Matroshri) सर्व खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडेदेखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

राजकीय चर्चांनुसार, सेनेच्या 18 खासदारांपैकी 13 ते 14 खासदार कोणत्याही क्षणी शिंदे गटाला जाऊन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खासदारांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव डॉ श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांचाही समावेश असून ते या बैठकीला उपस्थित राहणार का? हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेसाठी स्थानिक राजकारणात कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) अडसर ठरत आहे. यामुळे काम करण्यासाठी मर्यादा येतात म्हणून नगरसेवकांची नाराजी असल्याचे समजते आहे.

आमदारांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर सेनेत फूट पडली तर हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जाईल. नाशकात प्रशासकराज असले तरीदेखील येणाऱ्या महापालिका नगरपालिकेत विद्यमान असलेले परंतु सद्यस्थितीत कार्यकाळ संपलेल्या नगरसेवक जर शिंदेगटाला जाऊन मिळाले तर सेनेची नाशकातदेखील अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या